किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली.

तसेच यामुऴे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मात्र मोठ्या प्रमाणात खळबळ माजल्याचं चित्र पाहायला मिळालं.

तसेच हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत किरीट सोमय्या वादाला तोंड फोडलं होतं.

Advertisement

टीकाटीप्पनीच्या या सत्रामुळे राजकीय वर्तुळात मात्र अनेक चर्चांना उधाण आलं होतं.

त्यातच आज किरीट सोमय्या यांनी पुन्हा आपला मोर्चा हसन मुश्रीफांकडे वळवला आहे.

आज दुपारी किरीट सोमय्या हसन मुश्रीफांची तक्रार केली आहे.

Advertisement

हसन मुश्रीफ यांच्या 1500 कोटी रुपयांच्या ग्रामपंचायत कॅान्ट्रॅक्टर घोटाळ्याची तक्रार

आज पुण्यातील पोलिस अधिक्षक आणि लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालयात दुपारी 1 वाजता केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांमुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

Advertisement

त्यामुळे त्यातच आज हसन मुश्रीफांविरोधात ते तक्रार करणार असल्याने या प्रकरणात आता आणखी काय खुलासे होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.