पुणे : अनाथांची माय ( Mother of orphans) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे निधन (Died) झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील (Pune) गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) उपचार सुरु होते. महिन्याभरापूर्वी त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

हर्नियाची (Hernia) शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या उपचाराला पूर्णपणे प्रतिसाद देत होत्या. पण आज अचानक त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणे बंद केले आणि रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती सिंधुताई यांचे निकटवर्तीय सुरेश वैराळकर यांनी दिली आहे.

Advertisement

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले होते.

वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी होती. बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले होते.

सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलांचा सांभाळ केला. त्यामुळे त्यांना अनाथांची माय म्हणून ओळखले जायचे. अनाथ मुलांना शिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याचे काम सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे.

Advertisement

विविध संस्था स्थापन करून त्यांनी अनाथ मुलांना शिक्षण दिले आहे. युवतींना मोठे करून आर्थिक दृष्टया स्वावलंबी करून त्यांचे लग्नही त्यांनी लावली आहेत.

सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या संस्था

१ बाल निकेतन हडपसर, पुणे

Advertisement

२ सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा

३ अभिमान बाल भवन, वर्धा

४ गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)

Advertisement

५ ममता बाल सदन, सासवड

६ सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे

Advertisement