मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस ५ राज्यांपैकी ३ राज्यातल्या विधानसभा निवडणूका (5 State Assembly Elections) लढवणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीबाबत मेगा प्लॅनसुद्धा (Mega Plan) सांगितला आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी निवडणूक (Election) लढवणार असल्याची घोषणा (Announcement) केली आहे. शरद पवारांनी स्वतः उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh) दौरा (Tour) करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उत्तर प्रदेश, गोवा (GOA) आणि मणिपूर (Manipur) या तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणूक लढवणार आहे. पाच राज्यात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार आहे.

Advertisement

मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार (MLA) होते. तिथे काँग्रेससोबत पाच जागांवर निवडणूक लढवणार आहोत. तसेच गोव्यात काँग्रेस पार्टी (Congress Party), तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहेत.

काही ठिकाणी आम्ही जागा लढवू इच्छित आहोत. त्याची माहिती दोन्ही पक्षाला दिली आहे. येत्या दोन दिवसात निर्णय होईल, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

Advertisement