ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

काँग्रेसचा बडा नेता आज भाजपमध्ये

काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून एक एक नेता बाहेर उड्या टाकत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये प्रवेश सुरू असताना भाजपत मात्र गेल्या काही दीड वर्षांत फारसा कुणीही प्रवेश करीत नव्हते; परंतु मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी काँग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे. अर्थात हा नेता गेले काही वर्षे तसा विजनवासात होता.

कृपाशंकर सिंह यांच्या हाती कमळ

राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर काँग्रेसमधून बड्या नेत्यांचे भाजपमध्ये पक्षांतर होण्याची मालिका सुरूच आहे.

गेल्या काही काळात ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत कमळ हातात घेतल्यानंतर आता मुंबई काँग्रेसशी संबंधित असलेल्या कृपाशंकर सिंह यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच काळाने आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी केली आहे.

उत्तर भारतीयांत स्थान

काँग्रेसचे मुंबईतील माजी नेते तसेच राज्य सरकारमधील माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

उद्या दुपारी १२ वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

सिंह हे गेल्या बऱ्याच काळापासून पक्षीय राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मुंबई काँग्रेसमधील उत्तर भारतीय नेत्यांपैकी ते एक नेते आहेत.

फडणवीस यांनी दिले होते संकेत

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेले कृपाशंकर यांनी जम्मू-काशमीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याला पक्षाने विरोध केल्याचे निमित्त साधून २०१९ मध्ये काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता; मात्र तेव्हापासून ते कुठल्याही पक्षाशी संलग्न नव्हते. देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंह हे लवकरच भाजपात प्रवेश करतील, असे संकेत दिले होते.

 

You might also like
2 li