पुणे – सध्या पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण (Crime Rate) अधिकच वाढत चालले आहे. अश्यातच पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एक धडाकेबाज कारवाई करत शहरातील स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या (pune police) या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी मसाज (Pune spa) सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात वारजे येथे स्पा सेंटरच्या (Pune spa) नावाखाली चालणाऱ्या अवैध वेश्या व्यवसायाचा पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला.

तसेच, या ठिकाणी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून (Pune spa) घेणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सध्या पुणे शहरात सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेच्या वतीने शहर आयुक्तालयातील अवैध धंद्यावर धाड कारवाई सुरु आहे. यावेळी वारजे माळवाडी हद्दीत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई करत दोन पिडित महिलांची मुक्तता करण्यात आली आहे.

या प्रकरणी स्पा मॅनेजर आणि स्पा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे येथील ओम स्पा सेंटर येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी सदर ठिकाणी धाड कारवाई करण्याचे आदेश सामाजिक पथकास दिले.

त्यानुसार यावेळी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून येथे सुरू असलेला वेश्या व्यवसायावर कारवाई केली. यावेळी मॅनेजर तिवारी यास अटक करण्यात आली असून मालक साळवे हा पसार झाला आहे.

या प्रकरणी वारजे माळवाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या पूर्वी देखील पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अश्या प्रकारचे गुन्हे घडल्याचं पाहायला मिळालं आहे.