मुंबई – सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ सुरुवातीपासूनच (Jacqueline Fernandez) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) रडारवर राहिली. या प्रकरणाच्या तपासामुळे तिच्या परदेश दौऱ्यांवर देखील बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचं नाव आरोपी म्हणून लिहिण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन (Jacqueline Fernandez) फर्नांडिसला माहिती होती की, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) खंडणी वसुल करणार आहे.

त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आता जॅकलिनच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, जॅकलिनला याप्रकरणी अद्याप अटक झालेली नाही. कारण आतापर्यंत न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतली नसली तरी तिला देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

जॅकलीनला घोडा आणि मांजर गिफ्ट करणारा सुकेश चंद्रशेखर कोण?

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हा बंगळुरुतला एक उद्योगपती आहे. सुरुवातीला नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांची फसवणूक केली.

75 जणांचे 100 कोटी रुपये घेऊन त्याने पोबारा केला. निवडणूक आयोगात ओळख असल्याचं सांगून हवं ते चिन्ह मिळवून देण्याचं आमिष त्यानं दाखवलं. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला 2017 मध्ये अटक केली.

दरम्यान, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. या हिऱ्याच्या अंगठीवर J आणि S ही अक्षरे होती. जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

की अभिनेत्रीला ठगकडून करोडोंची भेट देखील मिळाली होती, ज्यामध्ये 9 लाख रुपये किमतीचा घोडा आणि 52 लाख किमतीची पर्शियन कार होती. तसेच, सर्वात महाग किंमतीचा घोडा आणि मांजर सुद्धा देण्यात आलं आहे.