मुंबई – गणेशोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह (Amit Shah) मुंबई (mumbai) दौऱ्यावर येत आहे. 5 सप्टेंबरला अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान शाह सर्वप्रथम लालबागच्या राजाचे (lalbaugcha raja) दर्शन घेणार आहेत. वर्ष 2017 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अमित शाह हे लालबागचा राजा गणेशोत्वाला भेट देण्यासाठी आले होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाह यांनी हा दौरा टाळला होता. त्यानंतर यंदा अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

यावेळी ते मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात करणार आहेत. तसेच, अमित शाह (Amit Shah) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अमित शहा महाराष्ट्रात येणार आहेत, त्यांची भेट घेणार का? असे प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात फिरत आहेत. मात्र, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शनिवारी या सर्व प्रश्नांचे उत्तर दिले आहे.

फडणवीस म्हणाले की, “अमित शाह हे दर गणेशोत्सवात मुंबईला येतात. काही गणपतींचे दर्शन घेतात. यावेळी ते लालबागचा राजा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार तसेच माझ्याकडील गणपतींचे दर्शन घेतील.

भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. राज व शाह भेटीचा कोणताही कार्यक्रम नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राज आणि शाह यांची भेट होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

असा असेल अमित शहा यांचा मुंबई दौरा…

अमित शाह (Amit Shah) आपल्या दौऱ्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वप्रथम लालबागच्या राजाचे (lalbaugcha raja) दर्शन घेणार आहेत.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचे शासकीय निवासस्थान ‘सागर’ बंगल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis ) यांचीदेखील भेट घेणार आहेत.