जळगावसह राज्यातील विविध शहरांत शाखा असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यात अनेक बडे मासे गुंतले आहेत.

त्यातील अवसायकाला अटक केल्यानंतर आता या गैरव्यवहारात भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य चंदुलाल पटेल यांचे नाव संशयित म्हणून पुढं आलं आहे.

एक महिन्यापूर्वीच वाॅरंट

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत आर्थिक अपहार झाल्याप्रकरणात आमदार चंदूलाल पटेल यांचे नाव संशयित म्हणून समोर आले आहे.

Advertisement

त्याच्या विरोधात एक महिन्यापूर्वी अटक वॉरंट काढण्यात आले आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली.

१८ जणांना अटक

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ‘बीएचआर’प्रकरणी जळगाव शहर, जामनेर, भुसावळ, संभाजीनगर धुळे, मुंबई, अकोला आणि पुणे या जिल्ह्यात एकाच वेळी छापे घालून १२ जणांना अटक केली होती.

त्या वेळीच पटेल यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले होते. व्यावसायिक भागवत भंगाळे, प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला, जयश्री शैलेश मणियार (सर्व रा. जळगाव) जितेंद्र रमेश पाटील, राजेश लोढा (रा. जामनेर), जामनेरचे नगरसेवक छगन झाल्टे, भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रीतेश जैन ( रा. धुळे), अंबादास मानकापे ( रा. संभाजीनगर), जयश्री तोतला (रा. मुंबई) व प्रमोद कापसे (रा. अकोला) यांना अटक झाली होती. त्यातच आमदार चंदूलाल पटेल यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते.

Advertisement

आमदार पटेल फरार

या प्रकरणात बरेच दिवस फरारी असलेल्या अवसायक जितेंद्र खंदारेला नुकतीच अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक झाली आहे.

बीएचआर घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी चंदूलाल पटेल यांच्या विरोधातही अटक वॉरंट काढले आहे. पटेल फरारी असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती नवटके यांनी दिली आहे.

 

Advertisement