मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर असली असून, अंधेरी (Andheri ) पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल (Bjp Muraji Patel) हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीसह भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पक्षचिन्ह मिळूनही उमेदवार उभा केला नाही. या ठिकाणी भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली. मात्र, आता भाजपने यातून काढताय पाय घेतल्याचे समोर आले आहे.

आज झालेल्या बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी इतर उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रामुळे वळण मिळालं असल्याचं बोललं जात आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेबत ठाकरे हे नाव दिलं असून, मशाल हे चिन्ह दिल आहे, तर शिंदे गटाला ढाल तलवार हे नवं चिन्ह दिलं आहे.