मुंबई – एनसीबी (NCB) मुंबईचे माजी संचालक ‘समीर वानखेडे’ (sameer wankhede) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखडे यांना जात पडताळणी समिती (Caste scrutiny committee) कडून क्लीन चिट मिळालीये. मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘नवाब मलिक’ (Nawab Malik) यांच्यासह इतरांनी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर इतर बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता.

मात्र, आता यामध्ये वनखानडे यांना क्लीन चिट मिळाली आहे. क्लीन चिट देताना समितीने अहवालात म्हटलंय, ‘वानखेडे जन्माने मुसलमान नव्हते; वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला असंही सिद्ध झाले नाही,

‘परंतु हे सिद्ध झाले आहे की ते महार -37 अनुसूचित जातीचे होते. “समीर वानखेडे (sameer wankhede) यांची जात नेमकी कुठली, ते मुस्लीम आहेत की दलित याविषयी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बरेच तर्क लावण्यात आले.

नवाब मलिक यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला असल्याचे आपण पहिले आहे. पण आता वानखेडेंना क्लिनचिट मिळाली आहे. यावेळी समीर वानखेडे (Nawab Malik) यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले होते.

समीर वानखेडे हे एनसीबीचे अधिकारी असताना त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) यांचा मुलगा ‘आर्यन खान’ याला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती.

त्यानंतर समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. तसेच, त्यांच्यावर अनेक खालच्या भाषेतील टीका देखील केली करण्यात आली.

मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात आरोपांची जंत्रीच सादर करत त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यातच मलिक यांनी वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता.