पुणे – प्रदूषणाला आळा बसावा म्हणून सीएनजी व ई-वाहनांचा (CNG and e-vehicle uses) वापर वाढला पाहिजे असा सांगितलं जात. पुण्यात (pune) जवळपास दोन लाख सीएनजीवर (CNG) धावणारी वाहने आहेत. पेट्रोल व डिझेल (petrol diesel) च्या तुलनेत सीएनजीचे दर कमी आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारक आपले वाहन सीएनजीवर रूपांतरित करीत आहे. मात्र, आता सीएनजी संदर्भात एक वाईट बातमी समोर आली आहे.

सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे 3.5 रुपयाने तर पीएनजीच्या दरात प्रति किलोमागे 1.5 रुपयाने वाढ केली आहे.

मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच नवे दर लागू करण्यात आले आहेत. या दरवाढीचा सर्वाधिक फटका देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला (Mumbai) बसला आहे.

अचानक झालेल्या या दरवाढीमुळे वाहनचालकांना प्रचंड फटका बसला असून वाहनचालकांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. मुंबईत सीएनजी दरात 3.5 रुपयाने वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे मुंबईत सीएनजी प्रति किलोग्राम 89.50 रुपये झालं आहे. तर मुंबईत पीएनजी दरात 1.5 रुपये झाली आहे. त्यामुळे मुंबईत आता पीएनजीची किंमत 54 रुपये प्रति एमसीएमवर गेली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणे शहर आणि परिसरात CNGच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. यावेळी पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली. एका किलोसाठी तब्बल 91 रुपये मोजावे लागत आहे.

कशी होत गेली दरवाढ :

जानेवारी – 66 रुपये

फेब्रुवारी – 68 रुपये

मार्च – 73 रुपये

एप्रिल – 77.20 रुपये

मे – 80 रुपये

जून – 82 रुपये

जुलै – 85 रुपये