कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सवादरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरामध्ये १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत १४४ कलम लावण्यात आलं आहे. पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.

करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी, प्रार्थनास्थळंबंद ठेवण्यासंबंधी तसेंच संचारास मनाई करणारे आदेश लागू केले आहेत.

दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये रस्त्यात, सार्वजनिक जागेत, सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोर ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इ.) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

Advertisement

हा आदेश १० सप्टेंबरपासून ते १९ सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल अशा इशारा पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.