मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

30 जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा शपथविधी पार पडला होता. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

नुकतंच या नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम देखील पार पडला असून, शिंदे गटाकडून नऊ तर भाजपाच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, आता या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणतं खातं कोणाला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अश्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच पुण्याचे (Pune) पालकमंत्री होण्याची दाट शक्यता आहे.

याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून (Chandrakant Patil) सूचक वक्तव्य करण्यात आले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

पुणे हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. पुण्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी पुण्याचे पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचे संकेत चंद्रकातं पाटलांकडून देण्यात आले आहेत. “तुम्ही आता पुढे व्हा अन् तुमच्या पालकमंत्र्यांशी बोलून घ्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इशारा केला.

ते पाहून उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर हस्य पहायला मिळाले. असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) एका कार्यक्रमात म्हणाले. दरम्यान, पुण्यात अजित पवार यांचा देखील चांगला दबदबा आहे.

त्यामुळे आता पुण्यात राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी पुण्याचे पालकमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दिले जाण्याची दाट शक्यता आहे.