मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut) यांच्या घरावर आज सकाळीच ईडीची (ED raids) धाड पडली आहे. पत्रा चाळ प्रकरणी ही धाड पडली असून, गेल्या तीन तासांपासून राऊत यांच्या घरात ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील घरी ईडीच्या (ED raids) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झाले आहे. त्यानंतर ईडीने याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे.

दरम्यान, ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

त्यामुळे आता ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले आहेत.

Advertisement

ईडीचे पथक सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या हरी दाखल झाले असून, सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे ताब्यात घेतली जात असल्याचे समजते.

पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यावर राऊत वेगवेगळी कारणे देत चौकशी टाळत होते. यापूर्वी 20 जुलैला नंतर 27 जुलैला ईडीने समन्य बजावले होते.

परंतू राऊत यांनी लोकसभा अधिवेशन सुरु असल्याने उपस्थित राहू शकत नाही, असे ईडीला कळविले होते. शनिवारी राऊत मुंबईत आले आणि ईडीने (ED raid) रविवारी सकाळीच राऊतांच्या घरी हजेरी लावली.

Advertisement

दरम्यान, शिंदे गटाचे औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट (sanjay shirsat) यांनीही राऊत यांना अटक होण्याची शक्यता असल्याचं विधान केलं आहे.

शिरसाट यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू होती, असा दावाही शिरसाट यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Advertisement