मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर काल रात्री अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आता शिवसेनेला (shivsena) वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) पुढची रणनीती ठरवण्यात व्यस्त असून, आज 7:30 वाजता वाजता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार आहे.

तसेच, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील असं वाटत असताना एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली असून,

फडणवीस स्वत: कोणतेही पद घेणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलंय. राजभवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिलीय.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा विजय झाला असला तरी शिवसेनेला (shivsena) मोठा धक्का बसला आहे.

आणि त्यानंतर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्षाचे जवळपास 40 हून अधिक आमदार सोबत घेऊन गुवाहाटीला रवाना झाले आहेत.

आणि त्या दिवसापासूनच महाराष्ट्रात या राजकीय नाट्याला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेत राजकीय भूकंप झाला.