पुणे – पुणे पोलिसांसाठी (Pune Police) नेहमीच डोके दुखी ठरत असलेल्या अट्टल गुंड गज्या मारणेला ( Gajya Marne ) पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पुणे गुन्हे शाखेच्या (Pune police) खंडणी विरोधी पथकाने गजानन मारणेच्या (gajanan marne) मुसक्या आवळल्या आहेत. साताऱ्यातील वाई जवळच्या ॲड.विजयसिंह ठोंबरे पाटील यांना फार्महाऊस वर भेटण्यासाठी आले असताना पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

दरम्यान, यापूर्वी त्याच्या टोळीतील एका गुंडाला अटक करण्यात पुणे पोलीसांना यश आले आहे. पुणे पोलीसांनी सापळा रचत नवले ब्रीज येथून त्याला अटक केली आहे. मयूर राजेंद्र निवंगुणे असे 24 वर्षीय गुंडाचे नाव आहे. तो नर्हे येथील वसंत प्लाझामध्ये राहणारा आहेत.

शेयर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी दिलेल्या चार कोटींच्या बदल्यात वीस कोटींची मागणी करत पुण्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला धमकी (Pune Crime News) दिली होती. त्या प्रकरणात गज्या मारणेसह त्याच्या टोळीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

शेअर दलालाचे 20 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात कोथरुडमधील गुंड गज्या मारणे (Gangster Gajanan Marne) काही दिवसांपूर्वीच पसार झाला होता. मात्र, त्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेकडून पथके तयार करण्यात आली होती.

तसेच, गुंड गज्या मारणे याला आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta) यांनी दिला होता.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी गज्या मारणे याच्यासह 14 जणांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचे आदेश मंगळवारी रात्री दिले होते.

गजानन मारणे याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक , अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,

सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतले आहे.