पुणे – पुणे पोलिसांसाठी (Pune Police) नेहमीच डोके दुखी ठरत असलेल्या अट्टल गुंड गज्या मारणेला ( Gajya Marne) पुणे पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पुणे गुन्हे शाखेच्या (Pune police) खंडणी विरोधी पथकाने गजानन मारणेच्या (gajanan marne) काही दिवसांपूर्वीच मुसक्या आवळल्या आहेत. साताऱ्यातील वाई जवळच्या ॲड.विजयसिंह ठोंबरे पाटील यांना फार्महाऊस वर भेटण्यासाठी आले असताना पुणे पोलिसांनी कारवाई करत गुंड गज्या मारणेला (Gajya Marne) अटक केली होती.

शेयर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी दिलेल्या चार कोटींच्या बदल्यात वीस कोटींची मागणी करत पुण्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला धमकी (Pune Crime News) दिली होती. त्या प्रकरणात गज्या मारणेसह त्याच्या टोळीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, आता गज्या मारणे याच्यासह त्याच्या अन्य साधीदारांना मोक्का न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपास करण्यासाठी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी याबाबत आदेश दिला.

गजानन पंढरीनाथ मारणे (रा.शास्त्रीनगर,कोथरूड) आणि मयूर जगदीश जगदाळे (वय ३१, रा. होळकरनगर, आंबेगाव पठार) असे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहे.

पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मारणेला १६ ऑक्टोंबर रोजी साताऱ्यातील वाई परिसरातून ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाने त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत मोक्का कोठडी सुनावली होती.

या गुन्ह्यात गज्या मारणेसह सचिन ऊर्फ पप्पू दत्तात्रेय घोलप (रा. गोविंदराव पाटील नगर, धनकवडी), हेमंत ऊर्फ बालाजी पाटील (रा. बुरली,पलुस, सांगली), फिरोज महंमद शेख (रा. समर्थनगर, कोडोवली, सातारा),

सराईत गुन्हेगार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर (वय ५६, रा. कोल्हापूर), अजय बबन गोळे (वय २८), मयूर राजेंद्र निवंगुणे (वय २४, दोघेही रा. नऱ्हे) आणि प्रसाद बापू खंडाळे (वय २९, पद्मावती) यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी ३८ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. मात्र, अखेर न्यायालयाने गुंड गज्या मारणेला न्यायालयीन कोठडी सुनावली.