पुणे : शहरातील (Pune City) काही रस्ते (Road) वाहतुकीसाठी (Road transport) ३१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत बंद (Closed) करण्यात येणार आहेत. शहरातील वाहुतुकीत काही बदल करण्यात आले आहे. नववर्ष (New Year) आणि शौर्यदिनानिमित्त (Heroic Day) वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांकडून (Traffic police) पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. १ जानेवारी (January 1) रोजी आंबेडकर अनुयायी राज्यातून कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे शौर्यदीन साजरा करण्यासाठी येतात.
शौर्यदिनानिमित्त यांच्या आंबेडकर अनुयायांची गर्दी पाहता शहरातील वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर वाहतुकीमध्येही बदल करण्यात आला आहे.
शहरातील कोणते रस्ते बंद आणि त्याला पर्यायी मार्ग कोणता ?
१ व्होल्गा चौकाकडून महमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सदरची वाहतूक ईस्ट स्ट्रीट रोडने सरळ इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे.
२ वाय जंक्शनवरुन महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून ही वाहतूक कुरेशी मशीद, सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात आली आहे.
३ इंदिरा गांधी चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकाकडून लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात आली आहे.
४ ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
५ सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक ताबुत स्ट्रीटमार्गे पुढे जाणार आहे.
नो-व्हेईकल झोन (31 डिसेंबर सायंकाळी सात ते 1 जानेवारी 2022 पहाटे 5 पर्यंत)
1 फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता – नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक (गुडलक चौक) ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार
2 जंगली महाराज रस्ता – झाशीची राणी चौक ते खंडोजीबाबा चौक
3 महात्मा गांधी रस्ता – हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक (पुलगेट चौकीपर्यंत)