मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची (10th And 12th students) परीक्षा ऑनलाईन (Offline Exam) पद्धतीने घेण्यात याव्या यासाठी विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

याच हिंदुस्थानी भाऊ ला अखेर जामीन (Bail) मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक (Vikas Pathak) याला जामीन मंजूर केला आहे. हिंदुस्थानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली होती.

धारावी पोलिसांनी (Dharavi Police) त्याला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांनतर पान्हा एकदा हिंदुस्थानी भाऊला न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

Advertisement

पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर हिंदुस्थानी भाऊ न्यायालयीन कोठडीमध्ये होता. हिंदुस्थानी भाऊला ३० हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबाबत हिंदुस्थानी भाऊचे वकील अनिकेत निकम यांनी माहिती दिली आहे.

काय होते प्रकरण ?

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या धारावी (Dharavi) मधील घरासमोर आज शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी पोलिसांनी (Police) विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज देखील केला होता.

Advertisement

या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊ असल्याचे सांगण्यात येत होते. मुंबईसह नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांमध्ये शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

विद्यार्थ्यांना भडकावल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो पोलीस कोठडीमध्येच होता. अटी आणि शर्तींसह त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Advertisement