पुणे – राज्यभरात यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांकडून (pune police) देखील जय्यत तयारी सुरु आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि नियोजन सांगितले आहे. त्यामुळे पुणे पोलिस सुद्धा गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) सज्ज आहे. गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. या उत्सवात शहरात गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांकडून अनेक मोठे कार्यक्रम सादर करण्यात येतात.

पुणे शहरात (pune Ganeshotsav) तब्बल 3600 सार्वजनिक मंडळ आहेत. त्यामुळे गणपती पाहण्यासाठी अनेक नागरीक पुण्यात दाखल होतात. प्रत्येक गणपतीजवळ मोठी गर्दी असते.

ढोल-ताशांच्या गजरात निघणारी गाणयाराची मिरवणूक असो वा.. जिवंत देखावे आणि सामाजिक उपक्रम असे विषय गणेश उत्सवादरम्यान पाहायला मिळतात.

दरम्यान, गणेश स्थापना (Ganesh chaturthi) आणि विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यात दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 2 दिवस दारु विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी हे आदेश काढले आहेत.

दिनांक 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस जिल्ह्यातील दारू दुकाने बंद राहणार (Liquor shops will remain closed) आहेत.

तसेच, शहरातील दुकानांवर वॉचही ठेवला जाणार आहे. कुठेही गैरप्रकार आढळल्यास किंवा आदेशाचे पालन न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यानुसार, 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून या काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मद्यविक्री करणारी दुकाने,

परमीट रूम आणि बिअर बार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित व्हावे. उत्सव काळातील इतर दिवशी दिलेल्या वेळेनंतरदेखील दुकानदार दारू विक्री चालु ठेवतात.

अशा बेकायदा कामास आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमार्फत अचानक तपासणी केली जाणार आहे. असं या पत्रकात सांगण्यात आला आहे.