अमरावती : चांदूरबाजार (Chandur Bazar) प्रथम वर्ग न्यायालयाने महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना दोन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात (Election affidavit) माहिती लपल्यामुळे त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

मुंबईतील (Mumbai) प्लॅटची (Flat) माहिती बच्चू कडू यांनी लपवल्यामुळे त्यांना २ महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा (Imprisonment)  ठोठावण्यात आली आहे.

Advertisement

बच्चू कडू यांची तूर्तास तरी अटक टळली आहे. बच्चू कडू यांना जमीन मिळाला असल्यामुळे त्यांना अटक झालेली नाही. बच्चू कडू यांचे हे प्रकरण ५ वर्षापूर्वीचे आहे. न्यायालयाने त्यांना आता शिक्षा सुनावली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयात (High Court) दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. २०१७ बच्चू कडू यांच्याविरोधात भाजपचे नगरसेवक (BJP Corporator) गोपाल तिरमारे (Gopal Tirmare) यांनी ही तक्रार केली होती.

अचलपूर मतदारसंघातून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवताना बच्चू कडू यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीमध्ये मुंबईतील फ्लॅट ची माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Advertisement

या प्रकरणावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, २०१४ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते. त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता.

हा काही गंभीर प्रकार नव्हता. मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

Advertisement