सिंधुदुर्ग : भाजप (BJP MLA) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अखेर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने (Sindhudurg Sessions Court) जामीन मंजूर (Bail granted) केला आहे. त्यामुळे राणे कुटुंबियांसाठी हा मोठा दिलासा असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान गेली तीन दिवस झाले नितेश राणे यांची तब्येत खालावली आहे. विशेष म्हणजे नितेश राणे यांना आज पहाटेपासून उलट्यांचा (vomiting) त्रास सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केल्याचे सांगितले जात आहे.

नगर पंचायत निवडणुकी वेळी संतोष परब (Santosh Parab Attack) हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांना अटक करण्यात आली होती. नितेश राणे यांचे हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेले होते.

Advertisement

पण सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हे नितेश राणे यांना सत्र न्यायालयातच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला होता. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता तो फेटाळण्यात आला होता.

तसेच २ दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

त्यामुळे नितेश राणेंचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला आहे.

Advertisement