सिंधुदुर्ग : भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना शिवसैनिक संतोष परब  (Santosh Parab Attack) हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र नितेश राणेंच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आले आहे.

नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत.

नितेश राणेंच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याच्या विनंतीनुसार त्यांना सावंतवाडी कारागृहाऐवजी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते.

Advertisement

शुक्रवारी रात्री त्यांचा रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले होते. शुक्रवारी रात्रीपासून नितेश राणे यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नितेश राणे यांची छातीत दुखत असल्याची तक्रार आहे. मात्र ओरोस जिल्हा रुग्णालयात कार्डियाक यंत्रणा आणि ह्रदयरोग तज्ज्ञ (Cardiologist) नाहीत.

त्यामुळे नितेश राणे यांना कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याचे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement

नितेश राणे यांचा रक्तदाब वाढला होता. आणि छातीतही दुखत होते. पोलिसांची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नितेश राणेंना कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले आहे.

संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी भाजप (BJP MLA)आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना एकाच वेळी कणकवलीमधील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दोघांचीही शुक्रवारी पोलीस कोठडी (Police Custody) संपत आल्याने त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. त्यानंतर राणेंच्या प्रकृतीमध्ये अचानक बदल झाला आहे.

Advertisement