पुणे – “भाजपा पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख छाटत आहे. रोहिणी खडसेंच्या हे लक्षात आलं, पंकजा मुंडेंच्याही लक्षात यायला हवं, असं म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अश्यातच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ही पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीत यावं असं म्हंटलं आहे.

पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) ऑफर देताना अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईनं भाजपा पक्ष वाढला.

पण त्यांच्याच मुलीला पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना हे लवकर कळलं. पंकजांनाही ते कळायला हवं. आता बारा आमदारांची यादी राज्यपाल जाहीर करतील,

त्यात पंकजांचं नाव नाही. पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख भाजपा कसे छाटतो हे यावरुन दिसतं. रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या, तसंच पाऊल पंकजा मुंडेंनीही उचलावं.” असं ते म्हणाले आहे.

दरम्यान, आता अमोल मिटकरींच्या या ऑफर नंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सुद्धा मोठं विधान केलं आहे. यावेळी त्या पुण्यात बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “विरोधी पक्ष असले तरी सर्वांचे एकमेकांशी संबंध चांगले असले पाहिजेत’, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

पुढे त्या म्हणाल्या, ‘अमोल मिटकरी यांना जर एखादा चांगला विचार मांडला असेल तर पक्ष जरूर त्या संदर्भाने विचार करेल.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) ही महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान महिला आहे. त्या कोणत्याही पक्षात राहिल्या तरी माझ्या नेहमीच त्यांना शुभेच्छा आणि प्रेम आयुष्यभर असेल, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.