मुंबई – “भाजपा पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख छाटत आहे. रोहिणी खडसेंच्या हे लक्षात आलं, पंकजा मुंडेंच्याही लक्षात यायला हवं, असं म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिली आहे. त्यावर आता अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना नव्या सरकारमध्ये स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण त्यांना या सरकारमध्ये स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती.

आणि त्यातच राष्ट्रवादीने त्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) राष्ट्रवादीत जाणार की काय अशी चर्चा सुरू होती.

दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडींवर आता रासप नेते महादेव जानकर (mahadev jankar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी एक मोठं विधान केली आहे.

महादेव जानकर काय? म्हणाले…

“पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्या भाजपमध्येच राहणार. त्यांच्या वडिलांचं आयुष्य भाजपमध्ये गेलं. त्यांचंही गेलं आहे.

त्या कुठे जाणार नाहीत. त्या भाजप सोडणार नाहीत. ऊन-पाऊस सर्वच पक्षात सुरू असतो”, असंही त्यांनी (mahadev jankar) सांगितलं.

तसेच, रासप नेते महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप त्यांची मागणी पूर्ण करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले…

अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, ‘गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईनं भाजपा पक्ष वाढला.पण त्यांच्याच मुलीला पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना हे लवकर कळलं. पंकजांनाही ते कळायला हवं.

आता बारा आमदारांची यादी राज्यपाल जाहीर करतील,त्यात पंकजांचं नाव नाही. पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख भाजपा कसे छाटतो हे यावरुन दिसतं. रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या, तसंच पाऊल पंकजा मुंडेंनीही उचलावं” असं ते म्हणाले आहे.