मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी कागदपत्र सादर करून याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानमधील दहशहतवादी (pakistans terrorist) संघटना आयएसआयकडून (ISI) नरेंद्र मोदींना हा धोका असल्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर आत्मघाती हल्ला करण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर हल्ला करण्यासाठी लश्कर ए तोयबाचे दहशतवादी रॅली किंवा कोणत्याही रोड शोमध्ये घुसू शकतात असंही गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता आहे. दहशतवादी पोलिसांच्या वर्दीत येऊन मोदींच्या कार्यक्रम स्थळी आत्मघाती हल्ला करतील. काही दहशतवादी सुरक्षारक्षकांच्याही संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

आयएसआय ही पाकिस्तानमधील प्रमुख दहशतवादी (pakistans terrorist) संघटना आहे. भारताच्या सीमांवर, देशांतर्गत काही ठिकाणांवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोका असल्याचं म्हटलं जातंय. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला ही माहिती दिली आहे.

देशभरात सध्या हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर झाली आहे. गुजरातेतदेखील लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण आठवडाभर गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

भारतातील मोठ्या नेत्यांना निशाणा बनवण्याचे आदेश आयएसआयने आपल्या दहशतवाद्यांना दिले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत वाढ :

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर येथे ते आज डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन करतील. त्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील.

21 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर असतील. तर 23 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील दीपोत्सव कार्यक्रमात ते सहभागी होतील.