मुंबई – शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut Case) यांना दोन दिवसांपूर्वी ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे. ईडीने यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. आणि दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

दरम्यान, संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणीनंतर ईडीच्या (Sanjay Raut Case) कोर्टात हजर करण्यात आलं होत. सध्या ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांची चौकशी सुरु आहे.

Advertisement

मिळालेल्या माहिती नुसार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं सध्या दिसत आहेत. सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी केलेल्या छापेमारीमध्ये काही महत्वाची कागदपत्रं हाती लागली आहेत.

ही कागदपत्रं राऊत यांच्या अलिबागमधील संपत्तीसंदर्भातील असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत हे म्हाडाच्या पत्रा चाळ पुनर्विकासाची परवानगी मिळवू शकले.

या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रोख रक्कम मिळाल्याच्या दिशेने आता ईडीच्या तपासाची दिशा निश्चित केली आहे. त्यामुळे आज न्यायालयामध्ये राऊत यांची कोठडी आणखी वाढवून मिळण्याची मागणी ईडीकडून केली जाणार आहे.

Advertisement

ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाशानुसार तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन राऊत यांनी अलिबागमध्ये दहा ठिकाणी जमीन खरेदी केलीय.

या संदर्भात एचडीआयएलच्या अकाऊटंटचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. एचडीआयएलच्या माध्यमातूनच हे व्यवहार झाल्याचं सांगितलं जात आहे.

राऊत (Sanjay Raut Case) यांच्या खात्यावर पैसे वळवण्याबरोबरच त्यांना प्रवीण राऊत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले होते.

Advertisement

हाच पैसा संजय राऊत यांनी अलिबाग आणि मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केलाय. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.