पुणे : एकीकडे राज्यात शिवसेना (Shiv sena) भाजप (BJP) आरोपांचा वाद सुरु असतानाच पुण्यातून (Pune) धक्कादायक (Shocking) माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या उपनेत्यावर (Deputy Leader) बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघुनाथ बबनराव कुचिक (Raghunath Babanrav Kuchik) असे शिवसेनेच्या उपनेत्याचे नाव आहे. २४ वर्षीय तरुणीला फसवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध बनून तिला घरोदार केले आणि बळजबरीने तिचा गर्भपात (Abortion)  केला आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.

याबद्दल २४ वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक करून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

पीडित तरुणीच्या सांगण्यानुसार, संबंधित गुन्हा गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल, मॉडेल कॉलनीतील (Modal colony) प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला आहे.

पीडित तरुणीने सांगितले की, शिवसेना उपनेते रघुनाथ बबनराव कुचिक आणि तुझे पेमसंबंध होते. आरोपाने तिला लग्नाचे खोटे अमिष दाखवले आणि अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी तुझाबरोबर शारीरीक संबंध ठेवले.

याच शारीरिक संबंधातून ती गरोदर राहिली. हीच माहिती तिने आरोपी शिवसेना उपनेता रघुनाथ कुचिक याला सांगितली तेव्हा त्याने जबरदस्तीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले.

Advertisement

गर्भपात न केल्यास तुला जीवे मारून टाकेन अशी धमकीही आरोपीने पीडित तरुणीला दिली होती. आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.