ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

कच-यावरप्रक्रिया न करताच कोट्यवधींची बिल

पुणेः महापालिकेच्या रामटेकडी कचरा डेपो हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असून त्यात सत्ताधारी भाजपचा हात आहे.

या गैरव्यवहाराची सीबीआय किंवा ईडीमार्फत चाैकशी करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

कचरा प्रकल्पाची पाहणी

सुळे यांनीआज सकाळी रामटेकडी व उरळीदेवाची येथील कचरा प्रकल्पांची पाहणी केली. या वेळी आमदारचेतन तुपे, आमदार संजय जगताप,

पुणे शहर राष्ट्रवादीकाँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक आनंद आळकुंटे, योगेश ससाने, वैशाली बनकर,नीलेश मगर आदी उपस्थित होते.

विरोध असताना प्रकल्प सुरू

रामटेकडीयेथे महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये लाखो टन कचरा पडून असून त्यावर कुठलीही प्रक्रिया न करता कोट्यवधींची बिले काढण्यात आली आहेत, असा आरोप खा. सुळे यांनी केला.

रामटेकडी येथील महापालिकेच्या रॉकेम प्रकल्पाशेजारच्यातेरा एकर जागेमध्ये पुणे बायोमायनिंग नावाने कचरा प्रकल्प उभा राहिला आहे.

हा प्रकल्पसुरू होत असताना भाजप वगळता सर्व पक्षाचे नगरसेवक व तत्कालीन खासदार शिवाजीराव अढळरावपाटील, माजी आमदार महादेव बाबर यांनी आंदोलन करून विरोध केला होता; मात्र महापालिकेतीलबहुमताच्या जोरावर हा कचरा डेपो उभारण्यात आला.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

येथील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे हडपसर, ससाणेनगर, सयदनगर व काळेपडळ या परिसरातील रहिवाशांनादुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.

येथील जलस्रोत दूषित झाले आहेत. तसंच, ससाणेनगर येथे खासगी शाळा असल्याने येथील हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पुणेकरांच्या पैशाची लूटस्थानिक नगरसेवक योगेश ससाणे यांनी खासदारडॉ.

अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे यांच्यासमवेत महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली होती. तेव्हा येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं आश्वासन देण्यातआलं होतं. प्रत्यक्षात काहीच झाले नाही.

येथील डेपोमध्ये केवळ रोजच्या रोज कचरा टाकलाजात आहे. त्यामुळं इथं कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत.

कचऱ्यावर प्रक्रिया न करताचती केल्याची बिले काढली जात आहेत. या माध्यमातून पुणेकरांच्या पैशाची लूट केली जातअसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

You might also like
2 li