Kareena Kapoor Khan: अभिनेत्री करीना कपूर खान सध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनय आणि ग्लॅमरसोबतच करीना तिच्या मेहनतीसाठीही ओळखली जाते. ती अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी गरोदरपणातही कामातून ब्रेक घेतला नाही.

21 सप्टेंबर रोजी करीना 42 वर्षांची झाली.
या निमित्ताने जाणून घ्या तिच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी.

दादा राज कपूर (Raj Kapoor) यांनी हे नाव ठेवले होते:

करीना, या जमान्यात या नावाला परिचयाची गरज नाही पण तुम्हाला माहित आहे का की तिचे पहिले नाव करीना नव्हते? तिचे आजोबा राज कपूर यांनी तिचे नाव (siddhima) सिद्धिमा ठेवले. मात्र, हे नाव काही दिवसच टिकले आणि तिची आई तनुजा (mother tanuja) यांनी नाव बदलले.तनुजा गरोदरपणात एक कादंबरी वाचत होती ज्यात एका पात्राचे नाव करीना होते. यातून प्रेरित होऊन तिला आपल्या मुलीचे नाव करीना ठेवायचे होते.

करिनाने अभ्यासात अनेक विषय आजमावले आहेत:

आज जरी करीना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे, परंतु तिने अभ्यासात वेगवेगळ्या विषयांमध्ये नशीब आजमावले आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. करिनाने मुंबईच्या मिठाबाई कॉलेजमधून (Mithibai college) वाणिज्य शाखेत (commerce graduate) पदवी घेतली आहे. त्यानंतर तिने कायद्याचे (Law) शिक्षण घेतले. यावेळी तिने (Harvard University) हार्वर्ड विद्यापीठात मायक्रो कॉम्प्युटर्सच्या (micro computers course) तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. या सगळ्यानंतर तीनी स्वतःसाठी फिल्मी जग निवडलं.

करिनाने या हिट चित्रपटांची ऑफर नाकारली आहे:

याआधी 2013 मध्ये ‘क्वीन’ (queen) चित्रपटाची ऑफर करिनाला आली होती, जी तिने नाकारली होती. (deepika padukone) दीपिका पदुकोणच्या आधी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ (chennai express) आणि ‘राम लीला’ (ram leela) सारखे चित्रपटही करिनाच्या झोळीत आले होते, पण अभिनेत्रीने या चित्रपटांना नाकारले. मधुर भांडारकरचा ‘फॅशन’ (fashion) हा चित्रपटही करीनाकडे आधी पोहोचला होता. करिनाने नकार दिल्यानंतर हा चित्रपट प्रियांका चोप्राला (priyanka chopra) ऑफर करण्यात आला होता. करिनानेही ‘कल हो ना हो’ (kal ho naa ho) नाकारला आहे.

जेव्हा करण जोहर करिनावर चांगलाच चिडला होता:

करीना आणि करण (karan johar) जोहर इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेंड्समध्ये (best friends) गणले जातात. मात्र, दोघांमध्ये एकदा कडाक्याचे भांडण झाले होते, त्यानंतर करण करीनाशी बराच वेळ बोलला नाही. करणने त्याच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटासाठी करिनाला अप्रोच केले होते. या चित्रपटासाठी करिनाने शाहरुखला (shahrukh khan) मिळालेल्या फीएवढे पैसे मागितले होते. यानंतर करण तिच्यावर चांगलाच चिडला.

‘पू’ची भूमिका साकारून करीना प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

करीना कपूरचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी झाला. 2000 मध्ये तिने ‘रिफ्युजी’ (refugee) चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘कभी खुशी कभी गम’ (kabhi khushi kabhi gham) मध्ये पूची (Poo) भूमिका साकारून प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने 2012 मध्ये सैफ अली खानशी (married saif ali khan) लग्न केले.