मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (shiv jayanti) तिथीनेच साजरी करा असे म्हटले आहे. साकीनाका (Sakinaka) येथे मनसेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांना या सूचना केल्या आहेत.

या कार्यक्रमावेळी राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा जन्म दिवस हा आपल्यासाठी एक उत्सवच आहे. एक सणच आहे. वाढदिवस वगैरे या गोष्टी सामान्य माणसांसाठी असतात.

महापुरुषांची जयंती असते. गणेशोत्सव असो की दिवाळी आपण तिथीने साजरी करतो. त्यामुळे शिवाजी महाराजांची (shivaji maharaj) जयंतीही तिथीनेच साजरी झाली पाहिजे, असे बोलले आहेत.

Advertisement

यावर पुढे ते बोलले की तिथिनेच शिवजयंती का साजरी करायची? याचं एकमेव कारण आपल्याकडे जेवढे सण येतात, मग ती दिवाळी, गणपती जेवढे काही सण येतात ते आपण तिथिने साजरे करतो.

तारखेने साजरे करत नाही. गेल्यावर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती. यावेळी दिवाळी त्याच तारखेला येत नसते. मागच्या वर्षी गणपती ज्या तारखेला आले त्याच तारखेला या वर्षी गणपती येत नसतात.

गणेशोत्सव तिथीनुसार येतो. जन्म दिवस आणि वाढदिवस आपले. महापुरुषांचा तोही छत्रपतींचा जन्म दिवस आपल्यासाठी सण आहे.

Advertisement

म्हणून तो सण तिथीने साजरा करायचा. म्हणजे तो आज केला पाहिजे असं नाही. जेव्हा तिथीने साजरी करायची तेव्हा याहून अधिक जल्लोषात साजरी करा,असेही राज ठाकरे यावेळी बोलले आहेत.