पुणे : ब्रेक फेल झाल्याने पुणे-मुंबई एक्स्प्रेस (Pune-Mumbai Express) वेवर आडोशी (Adoshi) गावाजवळ सात गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत.

यातील जखमींपैकी तिघांची परिस्थिती गंभीर असल्याचे समजत आहे. अपघात झाल्यानंतर जखमींना तत्काळ नवी मुंबईतील ( Navi Mumbai) महात्मा गांधी (Mahatma Gandhi) रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

या अपघातात दोन ट्रकच्या मध्ये अडकलेल्या स्विफ्ट कारमधील चौघे जण जागीच मृत्युमुखी पडले आहेत. अपघाताची घटना समजताच खोपोली पोलीस (Khopoli police), डेल्टा फोर्स (Delta Force), अपघातग्रस्तांच्या मदतीला पोहोचले आहेत.

Advertisement

पोलिसांची टीम आणि इतर यंत्रणांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे. अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली. तर जखमींना खोपोलीत अधिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

यामध्ये सहा वाहनांची एकमेकांना धडक झाली आहे. एक्सप्रेसवेवरुन जाणाऱ्या एका कंटेनरने पुढे जाणाऱ्या स्विफ्ट कारला धडक दिली. त्यांनतर स्विफ्ट कार तिच्यापुढे जाणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळली.

तसेच स्विफ्ट कारने दिलेल्या धडकेमुळे टेम्पो त्याच्यापुढे जात असलेल्या कारवर जाऊन आदळला. या कारच्यापुढे आणखी एक कंटेनर जात होता, ही कार त्या कंटेनरवर जाऊन आदळली.

Advertisement

 

अशा एकूण सात गाड्या एकमेकांवर जाऊन आदळल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

 

Advertisement