Breaking News Updates of Pune

भाजपला नागरिकांची नव्हे राजकारणाची काळजी;खा.चव्हाण यांची टीका

महाराष्ट्रात कोरोनाची भयंकर स्थिती आहे. नागरिकांचे प्राण धोक्यात आहे. यावेळी सर्वांनी एकत्र येत प्रामाणिक काम करणे गरजेचे आहे.

परंतु खासदार गिरीश बापट, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या विधानांवरून त्यांना जनतेच्या रक्षणापेक्षा राजकारणात अधिक रस असल्याचे दिसून येते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी केली आहे.

शहरातील कसबा, पर्वती आणि पुणे कँटोन्मेंट याच मतदारसंघात करोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी ही साथ रोखण्यात निष्क्रिय असल्याचे दिसून येते, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

खासदार बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन राज्य सरकार अपयशी असल्याची टीका केली होती.

पालकमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामाणिक काम करत आहेत.

परंतु, भाजपचे खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना केवळ राजकीय स्टंटबाजी करण्यातच धन्यता मानत असल्याची टीका त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.