Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

भाजपचा कोणीही कायमचा शत्रू नाही – खा. गिरीश बापट

राजकारणात कधीच कोणी कोणाचे मित्र आणि शत्रू नसतात. त्यामुळे शिवसेना ही आमची शत्रू नाही. राजकीय जीवनात सत्ता मिळविण्यासाठी अनेकदा जुळून घ्यावे लागते. त्यामुळे भाजपचा कोणीही कायमचा शत्रू नाही, असे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी म्हटले आहे.

पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील शिवसेना भवनात वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शनिवारी (दि.१९) खा. बापट यांनी उपस्थिती नोंदवली. या वेळी त्यांच्या समवेत महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

भाजप- सेना युती पुन्हा होणार ?

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गटनेता पृथ्वीराज सुतार, नगरसेवक बाळा ओसवाल यांनी बापट यांचे स्वागत केले. बापट यांनी अजित पवारांचा उल्लेख या वेळी केला. भाजप- सेना युती पुन्हा होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजची बापट यांची भेट महत्त्वपूर्ण समजली जात आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विनायक निम्हण यांनीही शनिवारी वर्धापनदिनाच्या निमित्ताने शिवसेना भवनाला उपस्थिती लावली. निम्हण यांनी सेनेला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

पाषाण, सुतारवाडी या भागात आजही निम्हण यांचे वजन आहे. त्यांचे पुत्र माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Leave a comment