मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर भाजप नेत्यानी सडकून टीका केली आहे. नवाब मलिक यांनी एनसीबी (NCB) आणि बीजेपीवर (bjp) अनेक आरोप केले आहेत.

कॉर्डिलिया क्रूझ पार्टी मध्ये आर्यन खान याला अटक केल्यापासून या सर्व प्रकरणावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे.

या सर्व प्रकरणात नवाब मलिक (sameer wankhede) यांनी समीर वानखेडे आणि भाजपवर गंभीर आरोप केले होते. यावरच आता भाजप नेते मोहित कंबोज (mohit kambhoj) यांनी ट्विट करत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

Advertisement

भाजप नेते मोहित कंबोज यांनी मलिक यांच्याविरोधात १०० कोटीचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे.

यावर मोहित कंबोज यांनी ट्विट (Twit) केले आहे. “आज फिर लेनी पड़ेगी मियाँ को बेल !” असे म्हणत त्यांनी ट्विट केले आहे.

Advertisement

क्रूझ पार्टीत (Cruise Drugs party) एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी कारवाई केली होती त्यावेळी भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय यांचा मेव्हणा ऋषभ सचदेव (Rishabh Sachdev) याला एनसीबीने ताब्यात घेतले होते.

ऋषभ सचदेव याला अटक केल्यानंतर भाजप नेत्याने फोन केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आल्याचा आरोप नवाब मालिकांनी केला होता. यामुळे नवाब मलिक यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता.

15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (Mazgaon Magistrate Court) नवाब मलिक यांना काही जामीन मंजूर केला आहे. यावरच बोलताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे.

Advertisement