Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

भाजपच्या नेत्यांनी पाय-यावरच भरविलं अधिवेशन

गोंधळ घातलेल्या १२ आमदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ आज भाजपनं विधानसभेच्या पाय-यावरचं अधिवेशन भरविलं; पण काही वेळानं विधानसभेच्या परिसरात असणाऱ्या मार्शलना पाठवून भाजप नेत्यांकडील माईक आणि स्पीकर काढून घेण्यात आले. त्यानंतर भाजपची नेतेमंडळी प्रचंड आक्रमक झाली.

महाराष्ट्रात आणीबाणी

सध्या जे सारं चालू आहे ते महाराष्ट्रातील आणीबाणी आहे. आमचा आवाज दाबला जात आहेत. तसेच माध्यमांचीदेखील मुस्कटदाबी केली जात आहे; पण तरीही आम्ही आमचा आवाज दाबू देणार नाही.

काहीही झालं तरी आम्ही सरकारविरोधात बोलतच राहणार आणि या सरकारचा भ्रष्टाचार उघडा पाडणार, अशी ठाम भूमिका राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या १२ आमदारांचे जे निलंबन झाले, ते चुकीचे आहे असे ते म्हणाले. त्याचाच निषेध म्हणून विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपच्या नेत्यांनी प्रति विधानसभा भरवली आणि विविध ठराव करण्यास सुरुवात केली.

आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

“विधानसभेला पहिल्यांदाच असे येथे उचलून आणण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असे झाले आहे. पत्रकारांवर दडपशाही करण्याचे काम सरकारने केले आहे.

लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम केले आहे. भ्रष्ट्राचार आम्ही मांडू नये, यासाठी काल 12 आमदारांना निलंबित करण्यात आले.

मी आणि आमचे लोक बोलणार हे माहिती होतं, म्हणूनच माईक जप्त करण्यात आला. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता”, अशा शब्दांत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

Leave a comment