ठाणे : मध्य रेल्वेवरील लोकलच्या ठाणे-दिवा या मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी भाजपचे (BJP) नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी वडापाव (Vadapav) खाल्ला मात्र बिल न देताच निघून गेले असल्याचा प्रकार घडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या ऑनलाईन उपस्थिती मध्ये रेल्वेच्य (Railway) पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे.

यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांनी दिवा ते ठाणे लोकल प्रवास केला.

Advertisement

यावेळी भाजप नेत्यांना भूक लागल्यानंतर गजानन वडापाव सेंटरमध्ये (Gajanan Vadapav Center) कार्यकर्त्यांसह वडापाव, भजी यावर ताव मारला. आणि भाजप नेते बिल न देताच तेथून निघून गेले असल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

भाजपच्या नेत्यांनी वडाप खाल्ले मात्र बिल कोणीच दिले नाही त्यामुळे सोशल मीडियावर भाजप नेत्यांवर टीका करण्यात येत आहेत. तसेच संमिश्र प्रतिक्रियाही उमटत आहेत.

गजानन वडापाव सेंटर मधून मंत्री आणि नेते बाहेर पडल्यावर कार्यकर्त्येही त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडले त्यामुळे वडापावचे बिल कोणीच भरले नाही. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचा बिलासंदर्भातील व्हिडीओ (Video) व्हायरल झाला आहे.

Advertisement