पुणे – पुण्यातील भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते विनायक अंबेकर (vinayak ambekar) यांना दोन दिवसापूर्वी मारहाण करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (shard pawar) यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषेत कविता लिहिल्यामुळे त्यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती.

याप्रकरणी आता चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडक पोलिस ठाण्यात (pune police) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप यात कोणाला ही अटक केलेली नाही.

आंबेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर व्हायरल झाला होता.

Advertisement

दरम्यान, आंबेकर (vinayak ambekar) मारहाण प्रकरणात भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कलम 504, 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

फेसबुकवर शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात

Advertisement

जाऊन त्यांना शनिवारी मारहाण केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते.

दरम्यान, विनायक अंबेकर यांनी देखील या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील प्रवक्ते अंकुश काकडे

यांनी आपल्याला मारहाण करायला लावली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. माझ्या कवितेत काही चुकीच्या ओळी होत्या, त्याबद्दल मी माफी देखील मागितली होती. असं ते म्हणाले.

Advertisement