अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत काँग्रेसवर (Congress) टीका केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. परंतु आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजप (BJP) कार्यकर्ते देखील लाठ्याकाठ्या घेऊन उभे आहेत.

अमरावतीतही (Amravati) भाजपच्या (BJP) कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. या आंदोलनाला हाणून पाडण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यालयावर चाल करून आल्यास त्यांना ठोकून काढू, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Advertisement

त्यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या परिसरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठा पोलिसांचा (Police) बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसने मुंबईत (Mumbai) मजुरांना पैसे देऊन गावाला पाठवले. तसेच या लोकांना कोरोना फैलावण्यासाठी काँग्रेसनेच उसकवले होते, असा थेट आरोप त्यांनी काँग्रेसवर केला होता. मोदींच्या या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होऊन आंदोलन करत आहेत.

नाना पटोले तुम्हाला महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये उष्टं खरकटे मिळते. त्यात तुम्ही समाधानी रहा. पटोलेंनी आता मोठ्यामोठ्या बाता मारू नये.

Advertisement

आज अमरावती येथे राजकमल चौकात झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे २५ कार्यकर्ते पण नव्हते, असा टोला बोंडे यांनी लगावला आहे.

खरं तर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच बळ आणि इच्छाही संपली, अशी टीकाही त्यांनी केली. आणि जर काँग्रेसची काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर आले तर त्याला झोडल्या शिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाहीत, अशी धमकी त्यांनी दिली आहे.

Advertisement