भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सातत्यानं कोणत्याही कारणावरून वाद-विवाद होत आहेत. राम मंदिर जागा खरेदीवरून झालेला वाद ताजा असताना आता गणेशोत्सव मंडपावरून वाद पेटला आहे.

शुल्कमाफी हेच वादाचे कारण

गणेशोत्सव जवळ येत असताना गणेशमूर्तीकार तसेच मंडळांच्या मंडपांवरून भाजप आणि शिवसेनेची युवासेना यांच्यात वाद पेटला आहे.

या मंडपांचे शुल्क माफ करण्याची युवासेनेची मागणी आहे, तर प्रथम या मंडपांना महापालिकेने परवानगी तर द्यावी, मग पुढच्या मागण्या करा, बाळाच्या जन्माआधीच बारसे करू नका, असे भाजपने सुनावले आहे.

Advertisement

युवासेनेची खिल्ली

गणेशमूर्तीकारांच्या तसेच गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना अजून महापालिकेने परवानगी दिली नाही. त्या परवानगीसाठी सायनच्या भाजप नगरसेवक राजश्री शिरवडकर यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे अर्ज केला आहे,

तर या मंडपांचे परवानाशुल्क, भाडे व इतर शुल्क माफ करावे, अशी मागणी युवासेना नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. युवासेनेने आधी मंडपांना परवानगी मिळावी यासाठी धडपड करावी. परवानगी मिळण्याआधीच शुल्कमाफीची मागणी हे म्हणजे बाळाच्या जन्माआधीच बारसे करण्यासारखे आहे, अशा शब्दांत भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी युवासेनेची खिल्ली उडवली आहे.

Advertisement