मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये (Press conference) भाजपाचे (BJP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) ईडीचे दलाल आहेत,असे बोलत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या हे ईडीचे (ED) दलाल आहेत, तसेच मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली.

त्याचप्रमाणे किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही-खिचडी खात असतो, असा दावा देखील संजय राऊत यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला आहे. किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.

Advertisement

आधी त्याचे थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार, असे विधान संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

तसेच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मंत्र दिला आहे. तो आयुष्यभराचा मंत्र आहे. ‘तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका’ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

यावेळी राऊत यांनी सांगितले की माझ्यासारख्या राज्यसभा सदस्याला केंद्रीय तपास यंत्रणांचे लोक का त्रास देत आहेत, असा प्रश्न करून त्याचे उत्तर दिले. ते म्हणाले, भाजपचे काही प्रमुख लोक मला तीनदा भेटले.

Advertisement

वारंवार मला हेच सांगितले की, तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थिती आम्हाला हे सरकार घालवायचे आहे. आमची सगळी तयारी झाली आहे.

दरम्यान संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात नाशिकमधून वाहने भरून शिवसैनिक मुंबईला आले होते.

Advertisement