मुबै बँकेच्या ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामुनगर, अंधेरी पूर्व आदी शाखांमध्ये बनावट कर्ज प्रकरणांच्या माध्यमातून कोट्यवधींचा अपहार होत असल्याची तक्रार एका सभासदाने थेट नाबार्डकडे केली होती.

त्यानंतर बँकेच्या दक्षता पथकाने केलेल्या तपासणीतून काही कर्ज प्रकरण बोगस आढळून आली आहेत. बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे सर्व राजकारण असून सत्ताधाऱ्यांकडून द्वेषापोटी हे सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

नेमकं प्रकरण काय ?

मुंबै बॅंकच्या कार्यपद्धतीवर आणि कर्ज देण्याच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

Advertisement

बँकेशी संबंधित काही मंडळींनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणत्याही प्रकरणात कर्जव्यवहाराचे करारपत्र न करताच, पात्रतेपेक्षा अधिक कर्ज मंजूर केल्याचं अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत.

दरेकरांनी चौकशीला सामारे जावंः थोरात

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. जसे इतरांना चौकशीला सामोरे जा, असं दरेकर म्हणतात.

त्याच पद्धतीने त्यांनीसुद्धा या चौकशीला सामोरं जावं, असं मत थोरात यांनी व्यक्त केसली. कोणत्याही चौकशीला सामोरं जायला मी एकवेळा नाही तर शंभर वेळा तयार आहे, असं दरेकर म्हणाले.

Advertisement

शिळ्या कढीला उत

“शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न आहे. दोन वेळा याचिका झाली काही सापडलं नाही. सहकार खात्यानं चौकशी केली. मी सरकारवर टीका करतो. त्यामुळे द्वेषापोटी चौकशी केली.

पोलिसांनी सी समरी केली आहे, तरीसुद्धा पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न आहे. माझे राजकीय विरोधक प्रकाश सुर्वेंचे पार्टनर पंकज कोटेचा यांच्यामार्फत हे सर्व केले जात आहे. त्या कोटेचाचा मुंबै बॅंकशी काही संबंध नाही, अशी भूमिका दरेकर यांनी मांडली.

Advertisement