पुणे : महानगरपालिकेच्या (Pune Muncipal Corporation) २३ गावांमध्ये ग्रामपंचायतीचे बोगस भरती (Bogus Recruitment Scam) प्रकरण उघड झाले आहे. त्यानुसार प्रशासनाने त्यांची बोगस पदावरून हकालपट्टी केली आहे.

सभागृहामध्ये नगरसेवकांकडून (corporators)या भरतीबाबत तक्रार केल्यानंतर प्रशासनाने या सर्व प्रकारचा तपास करून प्रकरण उघड केले आहे. त्यानंतर तब्बल ६२६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

पुणे जिल्ह्यातील (Pune District) २३ गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकाराने घेतला होता. त्यानुसार ३० जुन २०२१ रोजी महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती.

Advertisement

मात्र गावांचा महानगरपालिकेत समावेश होणार असल्याने अनेकांनी गावांमधील ग्रामसेवकांच्या मदतीने बोगस पद्धतीनं आपलं काम करत ठीक ठिकाणी आपली कर्मचारी म्हणून नियुक्ती करून घेतली.

परंतु अनेक गावांतून जिल्हा परिषदेकडे तक्रारी आल्यानंतर हा घोटाळा उघड झाला आहे . त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Chief Executive Officer of Zilla Parishad Ayush Prasad) यांनी चौकशी समिती नेमली होती.

त्याप्रमाणे रेकॉर्ड नुसार कर्मचारी – १००७ जिल्हा परिषदेने चौकशी केलेले कर्मचारी – १०४५, गावांमधील आकृतीबंधानुसार कर्मचारी – ३६२, जिल्हा परिषदेने निर्णय घेतलेले कर्मचारी – ११, चौकशी अहवालातील नियमवाह्य कर्मचारी – ६२६, चौकशीतील नियमबाह्य मात्र, यादीत नाव नसलेले – ४६,अशी नावे समोर आली.

Advertisement

बोगस कर्मचारी या गावातील

१. सुस – ४०,
२. बावधन बुद्रुक – ५५
३. किरकटवाडी – ६४
४. कोंढवे- धावडे – ६४
५. न्यु कोपरे – ४०
६. नांदेड – ३७
७. खडकवासला – ६६
८. नर्‍हे – ८५
९. होळकरवाडी – ३७
१०. औताडे -हांडेवाडी – २८
११. वडाची वाडी – १४
१२. नांदोशी- सणसनगर – १९
१३. मांगडेवाडी – ३६
१४. भिलारेवाडी – १५
१५. गुजर निंबाळकरवाडी – ३४
१६. जांभूळवाडी – कोळेवाडी – ४५
१७. वाघोली – 06

Advertisement