मुंबई : ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील (Mumbai) रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणजोत मावळली आहे.

बप्पी लाहिरी यांची काळ रात्री अचानक तब्येत बिघडल्यानंतर त्यांना जुहू (Juhu) येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

एका बंगाली कुटुंबात जन्मलेले बप्पी लहरी यांचे खरे नाव आलोकेश लहरी (Alokesh Lahari) हे होते. बप्पी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला होता. बप्पी लहरी यांना बप्पी दा आणि डिस्को किंग ऑफ इंडिया (Disco King of India) म्हणूनही ओळखले जाते.

Advertisement

बप्पी यांच्या वडिलांचे नाव अपरेश लहरी आणि आईचे नाव बन्सरी लहरी होते. बप्पी दा यांचा विवाह २४ जानेवारी १९७७ रोजी चित्रानी लाहिरीसोबत झाला होता.

बप्पी यांनी भारतीय चित्रपटात सिंथेसाईज डिस्को संगीताचा (Synthesized disco music) वापर लोकप्रिय केला आहे. आणि स्वतःच्याही काही रचना गायल्या आहेत. त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते.

वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, गँग लीडर, सैलाब यासारख्या सिनेमांतील त्यांची गाणी प्रचंड गाजली होती. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी ३ चित्रपटात ‘भंकस’ नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे ऐकायला मिळाले होते.

Advertisement

बप्पीदा यांना सोन्याची खूप आवड होती. त्यामुळेच ते नेहमी सोन्याने भरलेले दिसायचे. आज त्यांच्याकडे असलेल्या सोन्याची किंमत ३५ लाख १९६ रुपये एवढी आहे. तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या चांदीची किंमत २ लाख ७५ हजार एवढी आहे.