सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्या टीकेला फेसबुक पोस्ट द्वारे (Facebook Post) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले की, जनमानसात आमची एक वेगळी छबी आहे. आम्ही सामान्य जनतेकरीताच आजपर्यंत जीवन व्यतीत केले आहे.

काहींना आमची धडाडी आणि लोकप्रियता खुपत असते म्हणूनच कथित भ्रष्टाचाराचे मोघम आणि बिनबुडाचे आरोप करणे हा त्यांचा स्थायी भाव बनला आहे.

Advertisement

लोकांच्या गतीमान सोयी, सुविधांसाठी कोणत्या योजना राबविणे, लोकहिताची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय.. आम्ही भ्रष्टाचार केला आहे असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, स्वार्थ्याध भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा (Bomb)आहेत.

सहकाराचा गळा घोटून स्वाहाकार करुन आता रियल इस्टेटमध्ये घुसलेल्या व्यक्तींनी आजपर्यंत फक्त स्वार्थ पाहिलेला आहे.

Advertisement

स्वार्थ नसेल तर त्यांचा कोणताही उपक्रम होत नाही, अश्या व्यक्तींना निस्वार्थीपणे नागरीकांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींची वाढती लोकप्रियता सहन होणारी नाही म्हणून त्यांची नेहमीच कुरकूर असते, अशी जहरी टीका उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर केली आहे.

शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले होते?

सातारा पालिकेच्या निवडणूक (Satara Municipal Election) जवळ आल्या की वातावरण निर्मितीसाठी खासदार उदयनराजे भोसले नेहमीच स्टंटबाजी करून सातारकरांना विकासाची खोटी स्वप्न दाखवतात.

Advertisement

त्यामुळे सातारकरांना त्यांच्या त्यांच्या खोटेपणाची जाणीव झाल्याने त्यांना सातारा विकास आघाडीचा पराभव दिसू लागला आहे. खासदार सध्या कोट्यवधींच्या विकासकामांची खोटी स्वप्ने दाखवत आहेत.

मात्र, हा देखील विकास नुसता कागदावरच पाहायला मिळणार आहे असे म्हणत शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती.

Advertisement