महिंद्राने आपल्या Mahindra XUV700 ची किंमत जाहीर केली आहे. तसेच या कारच्या बुकिंगची तारीखही जाहीर केली आहे, ​2 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबरपासून अशा दोन टप्प्यात या कारचे बुकिंग आपल्याला दोन फेजमध्ये करता येणार आहे.p

पहिल्या 25 हजार Mahindra XUV700 AX7 टॉप-अॅन्ड मायनस पॅक कारची किंमत ही 20 लाखांच्या आत असेल. ही किंमत केवळ पहिल्या 25 हजार कार्स साठीच आहे.

सोनी 3D साऊंड, इलेक्ट्रिक स्मार्ट डोअर हँडल, 360o सराऊंड व्ह्यू, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरिंग, इलेक्ट्रॉनिक पार्क ब्रेक आणि वायरलेस चार्जिंग असे फिचर्स या कारमध्ये पहायला मिळतात.

Advertisement

एसयूव्ही कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि अमेझॉन अलेक्सा कॉम्पॅटिबिलिटीसाठी अॅड्रेनॉक्स सूट सादर करते. जे व्हॉईस कमांड वापरून सनरूफ ऑपरेट करू शकते.

XUV700 चार ड्रायव्हिंग मोडसह येते, ज्यात Zip, Zap, Zoom आणि Custom मोड्सचा समावेश आहे. XUV700 चे एक स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे एंट्रीसाठी पुढील सीट आपोआप मागे घेतली जाते.

सेफ्टी फीचर्स :- XUV700 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्सिंग कॅमेरा, 360 डिग्री साराऊंड व्ह्यू इत्यादी सेफ्टी फीचर्स मिळतात. यासह, एसयूव्हीला ऑटो-बूस्टर हेडलॅम्प (जे ऑटोमॅटिक रुपात हेडलॅम्प्स थ्रो आणि इंटेन्सिटी वाढवतात.), ड्रायव्हर स्लीप डिटेक्शन, पर्सनल सिक्योरिटी अलर्ट सारख्या अनेक सेगमेंट-फर्स्ट सेफ्टी फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.

Advertisement

इंजिन :- XUV700 टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल पॉवरप्लांटच्या निवडीसह उपलब्ध आहे. पेट्रोल युनिट 2.0 लीटर mStallion युनिट आहे, जे नवीन थार मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 198 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन mHawk इंजिन आहे जे 182 बीएचपी पॉवर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. XUV700 मध्ये 4X4 पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे