पुणे – नाशिक महामार्गावर टेम्पो केबलचे बंडल घेऊन पुण्याकडून नाशिक बाजूकडे जात होता. त्याचवेळी नारायणगाव येथून भाजीपाला घेऊन पिकअप येत होती.

थिगळ स्थळ येथे चासकमानधरणाच्या डाव्या कालव्याशेजारी या दोन्ही वाहनांची समोरा जोरदार धडक झाली. या अपघातात पिकअप चालक प्रदीप बरकडे व गुजरात येथील टेम्पो चालक हे दोघे जण जागीच ठार झाले.

कुठे झाला अपघात ?

पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर थिगळस्थळ (ता खेड ) येथे दोन वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहन चालकांचा जागीच मुत्यू झाला आहे.

ही घटना शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रदीप शिवाजी बरकडे (वय २१, रा. कंळब नांदूर, ता. आंबेगाव ) दुसऱ्या मृत्यू चालकाचे नाव समजू शकले नाही.

दोन्ही वाहनांचा चक्काचूर

याबाबत सविस्तर माहिती अशी, की रविवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेत दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने टेम्पोमधील केबलचे बंडल रस्त्यावर पडले, तसेच पिकमधील भाजीपाला रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत भोसले करत आहे.