ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पप्पू वाडेकरच्या खून प्रकरणात दोघांना बेड्या

लेकीला भेटायला आलेल्या तडीपार गुंडाच्या खून प्रकरणातील दोघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. खंडणी आणि हल्ला प्रकरणातून राहुल उर्फ पप्पू वाडेकर याचा खून करण्यात आला.

हत्या प्रकरणाचा उलगडा

पुणे जिल्ह्यात झालेल्या कुख्यात गुंडाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. राहुल उर्फ पप्पू वाडेकर या तडीपार गुंडाच्या खून प्रकरणी मुख्य आरोपीसह दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

रविवारी लेकीला भेटायला आला असताना गोळीबार करून, आणि नंतर डोक्यात दगड टाकून आरोपींनी राहुलला संपवलं होतं.

एकाच दिवशी दोन गुंडांच्या हत्या

एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन कुख्यात गुंडांच्या हत्या झाल्यामुळे रविवारी पुणे हादरलं होतं. राजगुरुनगरमध्ये राहुल उर्फ पप्पू वाडेकर या तडीपार गुंडाची हत्या करण्यात आली.

त्याच दिवशी म्हणजेच रविवारी दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकिर्वे या गुंडाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली.

हे आहेत आरोपी

राजगुरुनगर शहरालगत झालेल्या पप्पू वाडेकरच्या खुनाचा उलगडा झाला आहे. पुणे ग्रामीण विभागाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

मुख्य आरोपी मिलिंद जगदाळेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. तर अजूनही तीन आरोपी फरार आहेत. पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा अंदाज खेड पोलिसांनी आधीच वर्तवला होता.

राहुल उर्फ पप्पू वाडेकर याला चार महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते; मात्र तडीपारीचा आदेश झुगारत त्याने राजगुरुनगर शहरात प्रवेश केला.

 

You might also like
2 li