मुंबई – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं रविवारी (14 ऑगस्टला) पहाटे अपघाती (accident) निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात (accident) झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. असं देखील सांगितलं जात आहे.

मात्र, नंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान मेटे (Vinayak Mete) यांचं निधन झालं.

दरम्यान, विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सामाजिक चळवळीतील अनेकांना त्यांच्या या निधनामुळे धक्का बसला आहे.

प्रथमदर्शनी जरी हा अपघात वाटत असला तरी यात काही मंडळींनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या अपघात संबंधीचा तपास आता सीआयडी करत आहे.

याच संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही महत्त्वाच्या अपडेट्स विधीमंडळात (Assembly) बोलताना सांगितल्या.

तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai Pune Express Highway) अपघातांचे वाढते प्रमाण पाहता एक्सप्रेसवर ITMS सिस्टीमचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विनायक मेटे यांच्या अपघाताच्या तपासाबद्दल अधिकची माहिती देताना आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अपघात झाल्यानंतर मेटेंच्या ड्रायव्हरने जेव्हा 112 क्रमांकावर मदतीसाठी फोन केला

तेव्हा नवी मुंबई पोलिस मदतीसाठी तातडीने निघाले होते. पण अपघाताच्या धक्क्यामुळे ड्रायव्हर काहीसा गोंधळला आणि त्याला अपघाताचे नक्की लोकेशन सांगता आले नाही. आम्ही पनवेल जवळ आहोत इतकंच तो सांगू शकला.

त्यामुळे आता राज्य सरकार मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ITMS म्हणजेच इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम चा वापर करण्याच्या विचारात आहे.

तसे झाल्यास एक्सप्रेस वर होत असलेल्या हालचालींवर योग्य पद्धतीने लक्ष ठेवणे सोयीचे होईल. त्याशिवाय, 112 क्रमांकावर जेव्हा कोणताही व्यक्ती मदतीसाठी फोन करेल त्यावेळी

तो मोबाईल वरूनच फोन करेल हे गृहित धरून थेट त्या व्यक्तिच्या फोन चे लोकेशन पोलिसांना कळेल अशी व्यवस्था लवकरच करण्याचा विचार सुरू असल्याचे आश्वासन फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिले.