पुणे – काल मंगळवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या वाहनावर पुणे शहरातील कात्रज (pune katraj) परिसरात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत (Uday Samant) यांच्या वहानाची मागची काच फुटली. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख व आमदार ‘आदित्य ठाकरे’ (aaditya thackeray) यांची काल पुण्यातील कात्रज चौकात सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा आटोपल्यानंतर शिवसेनेचे काही कार्यकर्ते तेथून जात होते.

आणि याच दरम्यान, त्यांना शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांची चारचाकी गाडी दिसली. यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या.

Advertisement

दरम्यान, उदय सामंत हल्ल्याप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी संजय मोरे यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली असून, या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र, आता या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील दखल घेतली आहे. दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही’. असं त्यांनी म्हंटलं आहे.

Advertisement

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारताच ते म्हणाले की, “गाडीवर दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे काम पोलिसांचं आहे.

पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करतील. ज्यांनी भ्याड हल्ला करणं आणि दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. मी पोलिसांशी (police) बोलणार आहे. सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे.

कोणी भडकावू भाषण करून चिथावणी देण्याचं काम करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला आहे.

Advertisement